शिक्षण विभाग लांजा





शिक्षण विभाग पंचायत समिति लांजा यांचे शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत


    प्राथमिक शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे, समाजपरिवर्तनाचेआणि राष्ट्रीय विकासाचे एक प्रमुख आणि प्रभावीसाधनआहे. बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम(RTE) 2009 अन्वये 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाचा शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. शिक्षणापासून वंचित असणा-या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेता यावे, शिक्षणाच्या संख्यात्मक विकासाबरोबरच दर्जामध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने  शिक्षण विभाग पंचायत समिती ,लांजा  कार्यरत असून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणासाठी प्रयत्नशील आहे.

या विभागाचे कामकाम समग्र शिक्षा अभियान,शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन  व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्गदर्शनाने  केले जाते.




समावेशित शिक्षण उपक्रम 



शाळा पूर्व  तयारी अभियान -



शिक्षणविभाग(प्राथमिक)

शालेय सांख्यिकी माहिती

based on UDISE+ 2020-21 (30 SEPTEMBER 2020)

  1. तालुक्याच्या  एकूण प्राथमिक शाळांची संख्या-251
  2. तालुक्याच्या प्राथमिक(1लीते4/5वी)शाळांची संख्या-137
  3. तालुक्याच्या उच्चप्राथमिक(1लीते7/8वी)शाळांची संख्या-87
  4. तालुक्याच्या एकूण माध्यमिक शाळांची संख्या– 20
  5. तालुक्याच्या प्राथमिकशाळांमधील विद्यार्थी संख्या-6606
  6. तालुक्याच्या शाळांमधील शिक्षक संख्या-580