तालुका स्तरीय दिपावली प्रदर्शन

 तालुका स्तरीय दिपावली प्रदर्शन अहवाल

पंचायत समिती लांजा सन 2021

     समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण अंतर्गत दिनांक 29/10/2021 रोजी दिव्यांग विदयार्थी निर्मित दिपावली वस्तू विक्री व प्रदर्शन जि. .शाळा लांजा नंबर 5 येथे भरवण्यात आले होते.

    सदरचे प्रदर्शनासाठी विशेषतज्ज्ञ व विशेष शिक्षक यांनी विदयार्थ्यांच्या घरी तसेच शाळेत जाऊन विदयार्थ्यांकडुन पणत्या रंगविणे, भेटकार्ड तयार करुन घेणे, आकाश कंदील बनविणे इ. चे वस्तू बनवुन घेण्यात आल्या होत्या. सदरच्या प्रदर्शनामध्ये दिव्यांग विदयार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक पणत्या, भेट कार्ड, रंगीबेरंगी आकाश कंदील, टाकाऊतुन टिकाऊ वस्तू, मेणबत्या,कागदी पिशव्या, कापडी पिशव्या इ. वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.दिव्यांग विदयार्थ्यांच्या कला कृतींना वाव ‍ मिळण्याच्या हेतूने प्रदर्शन आयोजित केले होते. प्रदर्शनाचे उदघाटन  अधिक्षक सन्मा. श्री. नेताजी कांबळे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले, प्रदर्शनासाठी प्रमुख अतिथी म्हणुन गटशिक्षणाधिकारी सन्मा.श्री.बंडगर साहेब, विस्तार अधिकारी सन्मा. श्री. भागवत साहेब, सन्मा श्रीम.मोहीते मॅडम, माजी आरोग्य व बांधकाम सभापती सन्मा.श्री.दत्ताजी कदम साहेब, मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षण विभाग कर्मचारी, विषय तज्ज्ञ,विशेषतज्ज्ञ, विशेष  शिक्षक, पालक विदयार्थी, ग्राहक इ.उपस्थित होते. उपस्थितांनी दिव्यांग विदयार्थी निर्मित वस्तू पाहुन कौतुक केले, व विदयार्थ्यांच्या वबनविलेल्या वस्तू खरेदी केल्या